वर्धा,
st-employees-protests : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी निदर्शने केली. महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुत कृती समितीच्यावतीने विभागीय कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन लागू करण्यात यावे. सन २०१६-२० या कालावधीच्या कामगार करारासाठी ४ हजार ८४९ कोटींचे पॅकेज एकतर्फी जाहीर करताना यापूर्वीच्या कामगार करारान्वये देय असलेल्या वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टयांऐवजी २ टके व घरभाडे भत्ता ८, १६ व २४ टंयाऐवजी ७, १४ व २१ टके असा कमी केलेला होता. सदरचा कमी केलेला दर नोव्हेंबर २०२१ पासून वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टके व घरभाडे भत्त्याचा दर ८, १६ व २४ टके लागू करण्यात आला.
परंतु, एप्रिल २०१६ ते ऑटोबर २०२१ पर्यंतची कमी केलेल्या दरांची प्रलंबित थकबाकी देण्यात यावी, सन २०१८ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, कामगार कराराच्या तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे देय असलेला ५८ टके महागाई भत्ता मागील थकबाकीसह देण्यात यावा, घरभाडे भत्ता रा. प. कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा, इतर राज्यांप्रमाणे एस. टी. महामंडळासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. रा. प. महामंडळातील मध्यवर्ती कार्यशाळेमध्येच नवीन बस बांधणी करण्यासाठी चेसिसचा पुरवठा करण्यात यावा व स्वमालकीच्या बस बांधण्यात याव्यात आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी अतुल गौरखेडे, शम्मी पठाण, प्रमोद गुंडतवार, श्रीकांत ढेपे, राहुल मून, विलास राऊत, प्रदीप शेंडे, प्रफुल्ल लोनगाडगे, प्रशांत लोखंडे, राहुल ढगे, मधुकर शिवणकर, प्रमोद नगराळे यांच्यासह कृती समितीतील अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.