नागपूर,
Ninad Music Camp निनाद संगीत विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी सुगम संगीत शिबिराचा समारोप कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या शिबिरात एकूण ६० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. शिबिरादरम्यान विद्यार्थिनींना हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाणी शिकवण्यात आली. तसेच शिबिराच्या संचालिका आणि गुरू रेखा साने यांनी सुगम संगीत गायनातील महत्त्वाच्या टिप्स, माईक टेक्निक तसेच कराओकेवर गाण्यासाठी आवश्यक तयारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याशिवाय स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित ब्युटी पार्लर, स्किन केअर आणि हेअर केअर या विषयांवर तज्ज्ञ स्वप्ना साने यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सत्राला विद्यार्थिनींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. समारोप कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपली कला सादर करत सुंदर गाणी सादर केली. काही विद्यार्थिनींनी कराओकेवर तर काहींनी पेटी आणि तबल्याच्या साथीने गायन सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. संपूर्ण शिबिर अत्यंत यशस्वी ठरले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
सौजन्य: आशिष नाईक, संपर्क मित्र