थरारक हॉरर चित्रपटाची जोरदार एंट्री

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
The Conjuring universe movies नेटफ्लिक्सवर सध्या नवीन चित्रपट आणि वेब सीरिजचा मोठा ओघ सुरू असताना, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय हॉरर चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल तीन वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा चित्रपट सध्या भारतातील नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर झळकत आहे.
 

The Nun II, The Conjuring universe movies 
‘द कॉन्जुरिंग’ युनिव्हर्समधील महत्त्वाचा भाग असलेला ‘द नन २’ हा १०९ मिनिटांचा हॉररपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा ठरतो. फ्रान्समधील एका शांत गावात घडणाऱ्या गूढ घटनांभोवती या चित्रपटाची कथा फिरते. गावातील चर्चमधील पाद्रीचा रहस्यमय आणि भयावह मृत्यू झाल्यानंतर या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी सुरू होणाऱ्या तपासातून कथानक उलगडत जाते.
 
तपासादरम्यान The Conjuring universe movies समोर येणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे या मृत्यूमागे ‘वलाक’ नावाच्या प्राचीन आणि दुष्ट राक्षसी शक्तीचा हात असल्याचा संशय अधिक गडद होतो. या अमानवी शक्तीपासून गावातील लोक आणि लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी सिस्टर आयरीन पुन्हा एकदा या भीषण संघर्षात उतरते. चित्रपटातील सतत वाढत जाणारा तणाव आणि भयावह प्रसंग प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतात.अंदाजे ३३१ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात प्रचंड यश मिळवत सुमारे २,३१७ कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या या यशामुळे हा चित्रपट ‘कॉन्जुरिंग’ युनिव्हर्समधील एक महत्त्वाचा आणि यशस्वी भाग मानला जातो.
 
या चित्रपटात तैसा फार्मिंगा, जोनास ब्लोकेट, स्टॉर्म रीड आणि अ‍ॅना पॉपलवेल यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. IMDb वर ५.६ इतके रेटिंग असलेला हा हॉररपट सध्या पुन्हा एकदा ओटीटी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत असून, हॉरर प्रकारातील चित्रपट पाहणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे.