एआयची क्षमता मौलिक तत्त्वाशी जोडणे आवश्यक : पं. अग्निहोत्री

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
shankar-prasad-agnihotri : एआयची क्षमता अध्यात्मिक मूल्ये जसे की करुणा, सत्य आणि सामाजिक न्याय यांच्याशी जोडली गेली तर ते तंत्रज्ञान मानवतेच्या भल्यासाठी अधिक परिणामकारक होऊ शकते. परंतु, केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे आणि मनुष्याच्या अंतर्मुख प्रक्रियेची उपेक्षा करणे धोकादायक आहे; म्हणून शिकण्याची वृत्ती, आत्म-परीक्षण आणि नैतिक चौकट ठेऊनच एआयचा विकास व उपयोग करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
 
 

jk 
 
 
ते शनिवार, १३ रोजी गांधी सिटी पब्लिक स्कूल येथे मॅकमिलन संस्थेच्या वतीने संगणकीय विचारप्रक्रिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक डॉ. प्रिया मिश्रा, स्वरा अष्टपुत्रे, धनंजय शिंगणजुडे, राहुल चोपडा, प्रशासक अभिजित रघुवंशी आदी उपस्थित होते.
 
 
ते पुढे म्हणाले की, एक विचारशील समाज ज्यात शास्त्र आणि अध्यात्माचा समन्वय होईल. तिथे तंत्रज्ञान प्रगतीसाठीच नव्हे तर मानवतेच्या उन्नतीसाठीही सेवा करेल आणि व्यती व समुदाय दोन्ही अधिक समृद्ध व संतुलित जीवन जगू शकतील, असेही ते म्हणाले.
 
 
कार्यशाळेत सौरभ सुमन, पवन गुप्ता, मिलिंद आंगल आणि पंकज बोरकर यांनी विविध विषयांच्या अध्यापनामध्ये संगणकीय विचारप्रक्रियेचा प्रभावी वापर तसेच आधुनिक शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व, त्याचे उपयोग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.
संचालन ऋचा दुबे यांनी केले. वीणा भगत यांनी आभार मानले.