वर्धा,
umbrella-distribution : भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील गरीब व मेहनती हातमजुरांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने रोजंदारीवर काम करणार्या मजुरांना पावसापासून संरक्षण मिळावे व त्यांच्या दैनंदिन कामात अडथळा येऊ नये या उद्देशाने छत्री वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, राहुल पाटणकर, मयंक खंडागळे, ओम तिवारी, अनिल चव्हाण, आदित्य कोकडवार, अनिकेत भोयर, सारंग नेवारे, गणेश वर्मा तसेच युवा मोर्चाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.