वणी पोलिसांची वरळी मटक्याविरुद्ध धडक मोहीम

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
सहा गुन्हे दाखल

वणी, 
Wani Police's Crackdown Operation वणी पोलिस ठाण्याच्या पथकांनी अवैध वरळी मटका जुगाराविरुद्ध धडक कारवाई करत शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून सहा स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण 4 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंधी कॉलनी परिसरातील मनोहर बारसमोरील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकून आसिदखान आमीरखान पठाण व हरीश सुरेश कापसे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून वरळी मटका पट्टी बुक, कार्बन तुकडा, पेन व 950 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. एकतानगर येथील नगर परिषद कॉम्प्लेक्सजवळ दयाराम फत्ते यादव व सय्यद अल्ताफ सय्यद रजाक यांच्याकडून मटका साहित्य व 750 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
 

mataka 
 (संग्रहित छायाचित्र)
 
तिसèया कारवाईत ब्राम्हणी फाटा चौकातील रिलॅक्स बारसमोर अक्षय जगन दुपारे याच्याकडून मटका साहित्य व 530 रुपये जप्त करण्यात आले. तो शेख इकबाल शेख हुसेन याच्यासाठी मटका आकडे लिहिण्याचे काम करीत असल्याची माहिती समोर आली असून त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
 
 
चौथ्या कारवाईत दीपक चौपाटी जत्रा मैदान परिसरातून शंकर गणपत धंदरे याला पकडण्यात आले. त्याच्याकडून मटका साहित्य व 1 हजार 480 रुपये जप्त करण्यात आले असून आसिद खान मेहबूब खान हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पाचव्या कारवाईत नगर परिषदजवळील ज्योती बारच्या गल्लीमध्ये सय्यद शेरू सय्यद ताज आणि मंगेश शंकर शेंद्रे यांच्याकडून मटका साहित्य व 360 रुपये रोख जप्त करण्यात आले. सहाव्या कारवाईत भाजी मंडी परिसरात सोहेलखान अकबरखानकडून मटका साहित्य व 610 रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात बबलू उर्फ सय्यद जाफर सय्यद ननू हा फरार आहे.
 
 
या सर्व प्रकरणांमध्ये आरोपी हे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या वरळी मटक्याचा जुगार खेळवीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.