व्याधीपूर्वी योग केल्यास जीवन सुंदर व निरोगी राहते : नगराध्यक्षा-डॉ. तुळसकर

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट, 
nayana-tulaskar : आरोग्य हीच खरी संपत्ती असून आरोग्य चांगले असेल तर जीवनातील प्रत्येक क्षण नव्या उत्साहाने जगता येतो. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास आयुष्यातील अनेक संधींचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे व्याधी होण्यापूर्वी नियमित योग केला तर जीवन सुंदर, निरोगी आणि आनंदी राहते, असे मार्गदर्शन नगराध्यक्ष प्रा. डॉ. नयना तुळसकर यांनी केले.
 
 

j 
 
 
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालयात योग शिबिर सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत आज १५ रोजी बोलत होत्या. यावेळी प्रेम बसंतानी, प्राची पाचखेडे, डॉ. उमेश तुळसकर, नितीन सुखडकर, विद्या पेडके, भारत स्वाभिमान प्रभारी वर्धा जिल्हा अध्यक्ष वसंत पाल यांची उपस्थिती होती.
 
 
त्या पुढे म्हणाल्या की, भारतातील पहिल्या महिला डॉटर आनंदीबाई जोशी यांनी डॉटर होण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे व आहाराकडे पुरेसे लक्ष दिले नाही. परिणामी, त्यांना क्षयरोग झाला. या उदाहरणातून आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
 
 
बसतानी यांनी योग परिवाराच्या आरोग्य जनजागृती व समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. डॉ. उमेश तुळसकर यांनी युवक, महिलांनी या नि:शुल्क योग शिबीराचा फायदा घेण्याची विनंती केली. दिनेश राठोड, संजय चाफले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २१ जून या कालावधीत हा योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये प्राणायाम, योगासने, ध्यान आणि निरोगी जीवनशैलीबद्दल विविध तज्ज्ञांचे दररोज मार्गदर्शन लाभणार आहे.
 
 
संचालन संजय अवचट यांनी तर आभार राजेंद्र वरखडे यांनी मानले. यशस्वीते साठी हभप राजा महाराज शेंडे, माधुरी शिवणकर, संगीता आगरकर, प्रमोद भाईमारे, योगेश सुंकटवार, प्रा. अनिल तरोडकर, आदी परिश्रम घेत आहेत.