मुंबई
tukaram-mundhe सर्वसामान्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांची धडक कारवाई अतिशय आवडते. राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाऱ्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध गुटखा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांवर कारवायांचा धडाका लावला आहे. मुंढे यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असतानाच, आता एका माजी मंत्र्याने मुख्य सचिवांना लिहिलेले एक पत्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. आपल्या हटके मागणीतून त्यांनी प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर बोचरी टीका केली आहे.
tukaram-mundhe दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना एक पत्र धाडले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, तुकाराम मुंढे ज्या जिद्दीने कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, तशीच तत्परता इतर खातेप्रमुखांनीही दाखवणे गरजेचे आहे. मात्र, सध्या प्रशासनात तशी स्थिती दिसत नसल्याने सावजी यांनी एक अजब तोडगा सुचवला आहे. ‘ज्याप्रमाणे अशक्त रुग्णाला रक्ताची बाटली देऊन ताकद दिली जाते, त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते राज्यातील इतर सर्व विभागप्रमुखांना द्यावे,‘ अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
‘मुंढेंचे रक्त इतर अधिकाèयांना दिल्यास त्यांच्यातही तशीच कार्यक्षमता आणि प्रेरणा निर्माण होईल, ज्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल,‘ असे सुबोध सावजी यांनी पत्रात म्हटले आहे. सावजी यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, सध्या राज्यात केवळ अन्न व औषध प्रशासन विभागातच कडक कारवाई होताना दिसत आहे. हीच ऊर्जा इतर विभागांमध्येही संक्रमित व्हावी, हाच या मागणीमागचा मूळ उद्देश आहे. मुंढे यांच्या कामामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, जनतेमध्ये प्रशासनाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर पत्राची चर्चा
tukaram-mundhe तथापि, तुकाराम मुंढे यांच्या कामाची पोचपावती म्हणून काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी चक्क त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला होता. त्यातच आता माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य सचिवांना लिहिलेले हे उपरोधिक पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रशासनातील संथ कारभारावर ओढलेले हे ओढलेले ताशेरे आहेत की मुंढे यांच्या कामाची अनोखी पावती, अशा चर्चांना आता उधाण आले आहे. या पत्रावर आता मुख्य सचिव किंवा सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.