वणी पोलिसांची धडक कारवाई

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
धारदार सत्तूरसह आरोपी अटकेत

वणी, 
Action by Wani Police  शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी सत्तूर बाळगून फिरणाèया एका आरोपीला रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
aprodp
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या आदेशानुसार पोलीस पथक रंगारीपुरा परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी सत्तूर जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे घातक शस्त्र बाळगल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध कारवाई केली.
 
 
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश रमेश मोहबिया (वय 35, रा. रंगारीपुरा, वणी) असे आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन सावसाकडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल विशाल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आकाश अवचारे, मोनेश्वर खंडरे, गणेश मेशाम व नंदकुमार पुप्पलवार यांनी केली. दरम्यान, आरोपीविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार (शस्त्र) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगणाèया तसेच गुन्हेगारी कृत्यांचा प्रयत्न करणाèयांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वणी पोलिसांनी दिला आहे.