अभाविप विद्यार्थ्यांच्या श्रमदानातूनऐतिहासिक पायऱ्यांच्या विहिरीला नवसंजीवनी

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
वणीतील प्राचीन वारसा पुन्हा आला उजेडात

वणी, 
akhil bharatiya vidyarthi parishad शहरातील 4 ते 5 शतकांपूर्वीच्या ऐतिहासिक पायऱ्यांच्या विहिरीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून नवसंजीवनी दिली आहे. झाडेझुडपे आणि कचèयाने झाकल्या गेलेली ही प्राचीन विहीर स्वच्छ करून विद्यार्थ्यांनी वणीच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. वणी तालुक्यातील वणी, शिरपूर आणि पळसोनी या गावांमध्ये गोंड राजवटीत अंदाजे 400 ते 500 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पायèयांची विहीर असून त्यांना स्थानिक भाषेत बारव म्हणून ओळखले जाते. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर वणीच्या जलशुद्धीकरण केंद्रामागे नगाजी महाराज मंदिराजवळ स्थित आहे. दुर्लक्षामुळे विहिर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली होती, तसेच आतमध्ये कचरा साचल्याने हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांच्या नजरेआड झाला होता.
 
 
abvp
 
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्याच्या हितासाठी कार्यरत असलेली अभाविप ही विद्यार्थी संघटना सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम हाती घेत असते. येथील दुर्लक्षित ऐतिहासिक विहीर अभाविप कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इतर सहकाèयांना माहिती दिली. त्यानंतर इतिहासप्रेमी विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी तत्काळ एकत्र आले आणि श्रमदान मोहीम हाती घेतली. विद्यार्थ्यांनी विहिरी भोवतीची झाडेझुडपे तोडून परिसर स्वच्छ केला तसेच विहिरीत साचलेला कचरा बाहेर काढून संपूर्ण विहीर स्वच्छ आणि खुली केली. या विहिरीच्या पायèयांभोवती बांधण्यात आलेल्या भिंतीवर गोंड राजांच्या काळातील ऐतिहासिक खुणा व श्री गणेशासह सुंदर मूर्त्या काढलेल्या आहेत. त्या येथे अपभ्रंशित अवस्थेत दिसतात. या विहिरीच्या आत भुयारी मार्ग सरळ चंद्रपूर व इतर ठिकाणी जोडले असल्याचे जाणकार सांगतात.
 
 
या उपक्रमात अमित उपाध्ये, वैभव वाघमारे, अनिकेत बदखल, संदीप गोहोकार, सागर जाधव, अक्षय कवरसे, कपिल राऊत, वैभव मेहता, नीरज चौधरी यांनी नियोजनासह प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. यात शहरातील विद्यार्थी परिषदेच्या अनेक विद्यार्थ्यांनी नगरमंत्री आयुषी पुलेवार हिच्या नेतृत्वात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे वणीच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला चालना मिळाली असून नागरिकांकडून या कार्याचे कौतुक केले जात आहे. स्वच्छतेनंतर अनेक नागरिक या प्राचीन विहिरीला भेट देत असून ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ‘वारसा जपला तरच इतिहास जिवंत राहतो’ या संदेशाची प्रचिती देणाèया या उपक्रमामुळे वणीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी उजळणी मिळाली आहे.