संस्कृत संभाषण शिबिराचा समारोप उत्साहात

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Atre Layout, Nagpur अत्रे लेआउट येथील ललिता त्रिपुर सुंदरी जगदंबा देवस्थान आणि संस्कृतभारती महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दशदिवसीय संस्कृत संभाषण शिबिराचा समारोप उत्साहात झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत प्रशिक्षण प्रमुख शैलजा पांडे उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिबिरप्रशिक्षिका अंजली बेन्द्रे यांनी प्रास्ताविक केले. शिबिरार्थींनी विविध संस्कृत प्रस्तुती सादर करून शिबिरात आत्मसात केलेल्या ज्ञानाचे दर्शन घडविले.
 
 

80 
 
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शैलजा पांडे यांनी शिबिरातून शिकलेल्या संस्कृत भाषेचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याचे आवाहन केले.Atre Layout, Nagpur तसेच त्यांनी एक मूल्यपर कथा सांगून उपस्थितांना प्रेरित केले.शिबिराचे आयोजन संस्कृतभारती महानगर संपर्क प्रमुख मनोहर निचकवडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अंबिका देशपांडे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुषमा देशपांडे, पुष्पा इंदुरकर, सुषमा वखरे, चित्रा अय्यर तसेच संपूर्ण कार्यकर्त्या समूहाने विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:केशव कुकडे ,संपर्क मित्र