आता ट्रेनमध्ये बसवला जाणार ‘ब्लॅक बॉक्स’

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
railway black box विमानांमध्ये वापरला जाणारा ब्लॅक बॉक्स हा अत्यंत मजबूत इलेक्ट्रॉनिक उपकरण असतो. विमान दुर्घटनेपूर्वी आणि दुर्घटनेच्या वेळी घडलेल्या घटनांची माहिती त्यामध्ये नोंदवली जाते. त्यामुळे अपघाताचे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच धर्तीवर आता रेल्वेगाड्यांमध्येही ब्लॅक बॉक्स बसविण्याची योजना आहे.
 
black box
 
railway black box विशेषतः ट्रेनमधील फायर डिटेक्शन सिस्टम (आग शोध प्रणाली) आणि फायर डिटेक्शन सप्रेशन सिस्टम (आग नियंत्रण प्रणाली) यांच्यासाठी ब्लॅक बॉक्सचा वापर केला जाणार आहे.
यामुळे मजबूत आणि छेडछाड-प्रतिरोधक डेटा लॉगर तयार होईल. आग लागण्यापूर्वी आणि नंतरच्या सर्व हालचाली, प्रणालीला मिळालेले सिग्नल, ट्रिगर झालेले अलर्ट आणि प्रणालीच्या कार्याशी संबंधित विविध तांत्रिक बाबींची नोंद या उपकरणात केली जाईल. यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास तपास अधिक अचूकपणे करता येणार आहे.
railway black box वंदे भारत, अमृत भारतमध्ये आधुनिक मॉनिटरिंग प्रणाली
वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनमध्ये ओबीसीएमएस ही अत्याधुनिक प्रणाली बसवली जाणार आहे. ही एक महत्त्वाची डायग्नोस्टिक तंत्रज्ञान प्रणाली असून तिच्या मदतीने ट्रेनच्या चाकांची, बेअरिंगची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि रिअल-टाइम आरोग्य स्थितीवर सतत लक्ष ठेवता येईल. या प्रणालीमुळे तांत्रिक बिघाड वेळेवर ओळखता येतील आणि संभाव्य अपघात टाळण्यास मोठी मदत होईल.
railway black box कमी वेळेत स्मार्ट देखभालीवर भर
रेल्वे रेकच्या देखभालीसाठी लागणारा वेळ कमी करणे, स्मार्ट मेंटेनन्स प्रणाली विकसित करणे आणि कर्मचाèयांच्या कार्यक्षमतेसाठी मानके निश्चित करणे यावरही परिषदेत धोरणात्मक चर्चा होणार आहे. तसेच कॅरेज अँड वॅगन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अपघात, रुळावरून घसरणे यांसारख्या घटनांशी संबंधित विशेष प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याबाबतही निर्णय घेतले जाणार आहेत.