औद्योगिक क्षेत्रांतील मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष देणार

-कॅमिट शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी निवेदन -व्यापार-उद्योग क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
camit-delegation : चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (कॅमिट) च्या शिष्टमंडळाने अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या बैठकीत नागपूरच्या व्यापार आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या व ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर आणि मिहान या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांतील रस्ते, नाले व्यवस्था, अतिक्रमण, पथदिवे आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांची दयनीय अवस्थेतबाबत दीपेन अग्रवाल यांनी तातडीने सोयी सुविधा देण्याची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळात संजय अग्रवाल, अशोक संघवी, सूर्यकांत अग्रवाल आणि मुकुल अग्रवाल उपस्थित होते.

CAMIT-PR-15062026 
 
 
 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि स्थानिक लॉजिस्टिक्स आणि कच्च्या मालाच्या वाहतुकीचे प्रश्न मांडले खनिज क्षेत्र, कच्च्या मालाची वाहतूक, लॉजिस्टिक्समधील अडचणी, औद्योगिक भूखंडांची उपलब्धता आणि महसूल प्रक्रियांचे सुलभीकरण या विषयांवरही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. खाण क्षेत्रांपासून औद्योगिक क्लस्टर्सपर्यंत अधिक चांगली संपर्क व्यवस्था निर्माण करणे, चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४२१ अंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या वसुली वॉरंटांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाचाही मुद्दा शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. या विलंबामुळे व्यापारी आणि उद्योजकांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वसुली प्रक्रियेसाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित करणे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरविणे आणि प्रक्रिया अधिक परिणामकारक करणे आवश्यक असल्याची मागणी केली.
 
 
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिष्टमंडळाने उपस्थित केलेले सर्व प्रश्न सकारात्मकतेने आणि गांभीर्याने ऐकून घेतले. व्यापार आणि उद्योग क्षेत्राच्या समस्यांवर समन्वयाने उपाय शोधण्यासाठी उद्योग व व्यापारी प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास तत्त्वतः सहमती दर्शविली.