पाण्याच्या शोधात भटकलेले चितळ पांढुर्ण्यात

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
मोकाट श्वानांच्या तावडीतून वनविभागाने केली सुटका
 
तळेगाव (श्या.पं.), 
जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेले चितळ अचानक पांढुर्णा गावाच्या हद्दीत दाखल झाले. मात्र, चितळावर मोकाट श्वानांनी हल्ला केल्याने गावात शिरकाव केला. घटनेची माहिती मिळताच बिट गार्ड दिगंबर गणेशपुरे व राम गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून चितळाला श्वानांच्या तावडीतून सोडवून जीवदान दिले.
 
 
chital
 
जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने तहान भागविण्यासाठी वन्यजीवांनी लोकवस्तींकडे आगेकूच केली आहे. असेच एक चितळ पाण्याच्या शोधात पांढुर्णा गावाच्या हद्दीत आले. मात्र, गावातील मोकाट श्वानांनी चितळाचा पाठलाग करीत हल्ला केला. घाबरलेल्या चितळ गावात शिरकाव करीत सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती ग‘ामस्थांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ब‘ाह्मणे, बिट गार्ड राम गायकवाड व दिगंबर गणेशपुरे यांनी घटनास्थळ गाठले. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी मोठ्या शिताफीने चितळाला जाळ्याच्या सहाय्याने सुरक्षित पकडले. त्यानंतर वनविभागाच्या वाहनातून चितळाला जंगलात सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात मुत केले.