स्थानिक मासेमारांना डावलले; कंत्राटाची चौकशी करा

बसपाच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
वर्धा,
dharna-protest-led-by-the-bsp सेलू तालुयातील बोर जलाशयातील मासेमारीचे कंत्राट मुंबई येथील एजन्सीला देण्यात आले. पण, ही प्रकि‘या राबविताना स्थानिक मासेमारांना डावलत त्यांच्या रोजगारावर गदा आणण्यात आली. त्या एजन्सीला तब्बल दहा वर्षांसाठी मासेमारीचा कंत्राट देण्यात आल्याने यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवार १६ रोजी स्थानिक मासेमारांनी बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्त्वात झाशी राणी पुतळा चौकात धरणे आंदोलन केले.
 
 
dharna-protest-led-by-the-bsp
 
बोर जलाशय हा परिसरातील शेकडो मच्छीमार, मत्स्य कामगार व मजूर कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक मच्छीमार व कामगार या जलाशयामध्ये मासेमारी तसेच संबंधित कामे करतात. पण, या धरणातील मासेमारीचा कंत्राट स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था व स्थानिक नागरिकांना डावलत मुंबई येथील एजन्सीला देण्यात आले आहे. हा प्रकार स्थानिक मच्छिमारांवर अन्यायकारक आहे.
 
 
त्यामुळे बोर जलाशयातील मत्स्यव्यवसाय कंत्राट प्रकि‘येची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, कंत्राट देताना स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था व स्थानिक हिताचा विचार करण्यात आला होता की नाही, याची तपासणी करण्यात यावी. नवीन कंत्राटदारास स्थानिक मच्छीमार, मत्स्यकामगार व मजुरांना किमान ७५ टके रोजगार देण्याचे निर्देश देण्यात यावे. स्थानिक कामगारांना पूर्वीच्या दरापेक्षा कमी मजुरी दिली जात असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाचे नेतृत्त्व बसपाचे महाराष्ट्र महासचिव मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे, गणेश बावणे, निखील भगत यांनी केले.