संत तुकाराम मंदिराचे जमीनदाते अंधारे यांचा सत्कार

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
sant-tukaram-mandir : येथील दिगंबर गोविंद अंधारे यांनी संत तुकाराम मंदिर उभारणीसाठी 41 आर जमीन दान दिली. याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 
 
 
y15Jun-Andhare
 
 
 
अंधारे यांनी त्यांच्या देवगिरी परिसरातील मालकीच्या 7 एकर शेतीपैकी 41 आर एवढी जमीन तुकोबाराय बहुद्देशीय मंडळाच्या नावाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत दानपत्राद्वारे हस्तांतरित केली. या जमिनीचे बाजारमूल्य अंदाजे 31 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
 
 
भूमी अभिलेख कार्यालयात पार पडलेल्या दानपत्र सोहळ्याला नगरसेवक तथा आरोग्य सभापती एकनाथ माहुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेच्या वतीने दिगंबर अंधारे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अंधारे यांनी केलेल्या या दानामुळे संत तुकाराम मंदिर, वारकरी प्रशिक्षण संस्था आणि विविध संस्कार केंद्र उभारणीच्या कार्याला चालना मिळणार आहे.
 
 
याप्रसंगी जगद्गुरू संत तुकोबाराय बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश धुमाळ, सचिव शेखर चौधरी, महेंद्र सरतापे, रमेश ठाकरे, विनोद काळे, अ‍ॅड. जाधव, अ‍ॅड. नितीन जवके, अ‍ॅड. राऊत, विष्णू इंजाळकर, नंदू सरतापे, साहेबराव सरोदे, नाना पाटील, राजीव खडसे, काळे, रामा ठाकरे उपस्थित होते.