जप्त केलेले एचटीबीटी कापूस बियाणे आंतरराष्ट्रीयगुणवत्तेचे : बियाणे प्रयोगशाळेचा अहवाल

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
यवतमाळ, 
HTBT cotton seeds सध्या प्रामुख्याने विदर्भात ‘चोर बीटी’ असा उल्लेख केल्या जाणाèया एचटीबीटी कापूस बियाण्यांवर ते ‘अप्रमाणित’ असल्याच्या आक्षेपावरून धाडी मारल्या जात आहेत. या कृषी यंत्रणेने जप्त केलेल्या बियाण्यांची गुणवत्ता मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा दावा शेतकरी संघटना विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी प्रमुख मिलिंद दामले यांनी केला आहे. यवतमाळच्या कृषी विभागाने धाडीत 2025 मध्ये जप्त केलेले एचटीबीटी कापूस बियाणे गुणवत्ता चाचणीसाठी नागपूरच्या बियाणे प्रयोगशाळेकडे पाठविले होते. चाचणीचा अहवाल शेतकरी संघटनेने मिळवला असून या बियाणे प्रयोगशाळेने आपल्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे.
 
 
kapurs ds
 
यवतमाळ जिल्ह्यातील सावर व लाडखेड येथे धाडी मारून जप्त केलेले एचटीबीटी कापूस बियाणे ग्लायफोसेट (राऊंडअप) तणनाशक सहनशील असल्याची निष्कर्ष काढला आहे. बियाण्यांची तणनाशक सहनशीलता टक्केवारी 78, 86, 96 आणि चक्क 100 टक्के असल्याचे आपल्या जून, जुलै 2025 मध्ये दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. गेली 15 वर्षे शेतकरी संघटना तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक एचटीबीटी कापूस बियाणे तंत्रज्ञान मान्यतेसाठी लढा देत आहे.
 
 
कापसावरील निवडक तणनाशके सर्व तणांचे नियंत्रण करीत नसल्याने मजुरांद्वारे निंदण, खुरपण करावे लागते. सर्वांचे तण नियंत्रण एकाच वेळेस येत नसल्याने मजूर टंचाई निर्माण होते. शेतकरी तण व्यवस्थापनेतील मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी अप्रमाणित एचटीबीटी कापूस बियाणे लागवड करीत आहे, याकडे आघाडीने लक्ष वेधले आहे. याच ‘अप्रमाणित’ एचटीबीटी कापूस बियाण्यांना अधिकृतपणे ‘प्रमाणित’ करा या मागणीसाठी बुधवार, 17 जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे, हे येथे उल्लेखनीय.