प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला
 
अमरावती, 
Husband's murder case पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी मृतदेहाच्या हत्येचे रहस्य पोलिसांनी उलगडले. मृत व्यक्तीची ओळख अब्दुल रियाज अब्दुल अनीस (वय ३९, रा. अलीम नगर) अशी पटली होती. आता त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने ही निघृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी मृतक रियाजची पत्नी आणि तिचा प्रियकर शेख इक्राम शेख चांद उर्फ बाबू या दोघांना अटक केली आहे.
 
 
murdss dk
 
माहितीनुसार, रियाजचा काटा काढण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने पूर्ण नियोजन केले होते. संपूर्ण परिसराची रात्रीच्या वेळी रेकी करण्यात आली होती. तसेच मृतदेह कुठे लपवायचा, याची जागाही आधीच निश्चित झाली होती. सुरुवातीला एका बंद पडलेल्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी काही लोकांची वर्दळ असल्याने ठरल्यानुसार दोन दिवस काहीच करण्यात आले नाही. अखेर २८ एप्रिलच्या रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांना संधी मिळाली. घराच्या जवळच रियाजवर लाठीने जोरदार हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी रियाजचा मृतदेह एका पोत्यात भरला. त्यानंतर तो मृतदेह जवळच असलेल्या एका बंद पडलेल्या रुग्णालयाच्या छतावर नेण्यात आला आणि तिथल्या पाण्याच्या टाकीत फेकून देण्यात आला.
 
 
डीएनए चाचणीने ओळख पटली
 १३ मे रोजी पाण्याच्या टाकीतून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र, मृतदेह पूर्णपणे सडल्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी बेपत्ता लोकांचे रेकॉर्ड तपासले. अखेर डीएनए चाचणीच्या अहवालानंतर तो मृतदेह अब्दुल रियाजचाच असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासातच हत्येचे गूढ उकलून रियाजची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या.