प्रेमात-युद्धात सारे काही क्षम्य!!!

ट्रम्पसाठी इराणने घेतली मानसोपचारतज्ज्ञांची मदत

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
तेहरान
iran-america war trump असे म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सारे काही क्षम्य असते. इराण-अमेरिका युद्धादरम्यान इराणने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणाचा अभ्यास केला आणि त्यासाठी त्यांनी चक्क दोन निष्णात मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली.
 
trump 12
iran-america war trump या आशयाची बातमी ‘ड्रॉप साइट’ने दिले आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामासाठी अप्रत्यक्ष चर्चेदरम्यान, ट्रम्प यांच्या वर्तनाचा अंदाज घेण्यासाठी इराणने मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली होती. चर्चेदरम्यान ट्रम्प यांच्या वर्तनाचा योग्य अंदाज घेता यावा आणि चर्चा सकारात्मक दिशेने पुढे नेण्यास हा जरा वेगळा मार्ग स्वीकारला होता.
 
 
iran-america war trump एप्रिल महिन्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर तेहरानने आपल्या सल्लागार समितीमध्ये दोन मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश केला होता. दोन्ही देशांकडून सामंजस्य कराराचे प्रस्ताव दिले जात असताना, ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचवले जाणारे संदेश कसे असावे आणि त्यांच्या वर्तनाचा अंदाज कसा घ्यावा, याबाबत इराणी शिष्टमंडळाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या तज्ज्ञांना देण्यात आली होती.
iran-america war trump ट्रम्प यांचे वर्तन जरा सायकोपॅथिक प्रकारातील आहे. त्यामुळे त्यांना पाठवले जाणारे संदेश योग्य पद्धतीने तयार करणे, हा तज्ज्ञांच्या नेमणुकीमागील उद्देश होता. मुख्य म्हणजे सल्लागारांच्या म्हणण्यानुसार संदेश आणि लेखी संवाद पाठविण्यास सुरुवात केल्यापासून ट्रम्प यांच्या प्रतिक्रियांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे इराणी अधिकाèयांचे म्हणणे आहे.