वर्धेत कर्जमाफीच्या जीआरची होळी

सरसकट २ लाखापर्यंत कर्जमाफी द्या

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
वर्धा,
loan-waiver-gr-consigned महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुती योजनेतील अन्यायकारक निकष रद्द करून सर्व पात्र शेतकर्‍यांना सरसकट २ लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज मंगळवार १६ रोजी स्थानिक गांधी पुतळ्याजवळ शेतकरी आणि कामगार आंदोलन समन्वय समितीच्या वतीने आंदोलन केले. यावेळी कर्जमाफीच्या जीआरची होळी करून जिल्हाधिकार्‍यांमार्फत मु‘यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.
 
 
loan-waiver-gr-consigned
 
शासनाने अर्थसंकल्प सादर करताना पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुती योजनांतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकित पीक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या अटी व निकषांचा अभ्यास केल्यानंतर ही योजना राज्यातील बहुसं‘य शेतकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ देण्यास अपुरी व दिशाभूल करणारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कर्जमाफीवर शेतकर्‍यांनी आक्षेप घेत अशा कर्जमाफीचा जीआर रद्द करून सर्व पात्र शेतकर्‍यांना सरसकट २ लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
 
 
राज्यातील सर्व पात्र शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वअट न ठेवता सरसकट २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, २ लाखांपेक्षा जास्त थकित कर्ज असलेल्या शेतकर्‍यांनी प्रथम अतिरित रकम भरण्याची अट तात्काळ रद्द करावी, २०१९ पूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांनाही नव्या योजनेचा लाभ देण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवणारे निकष रद्द करावे, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेली प्रोत्साहनपर मदत वाढवून अधिक प्रभावी योजना लागू करावी, अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली. आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.