मंगरूळनाथ,
married-woman-harassed माहेरून दोन लाख रुपये आण या मागणीसाठी काश्मीरला यावे अन्यथा पेट्रोल टाकून जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मंगरूळनाथ पोलिस ठाण्यात १५ जून रोजी पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपाली महादेव चव्हाण वय २०,रा.आजगाव, ता.मंगरूळनाथ मुळ रा.खरोळा,ता. जि. वाशीम यांनी तक्रार दिली की, आरोपीं पती महादेव बाळू चव्हाण, सासरे बाळू प्रताप चव्हाण, सासू अनिता बाळू चव्हाण व नातेवाईकांनी संगणमत करून फिर्यादीकडे माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली.पैसे न आणल्यास पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली.तसेच पतीसोबत काश्मीर येथे भीक मागण्यासाठी जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही व आरोपींकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.या प्रकरणी येथील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.