सेलू,
mohua-wash-destroyed-in-hingniv सेलू तालुयातील हिंगणी शिवारात १५ रोजी पोलिस पथकाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ५ लाख ९० हजार रुपयांचा मोहा सडवा उद्ध्वस्त करण्यात आला. हिंगणी हे गाव सेलू पोलिस स्टेशनअंतर्गत येतं. पोलिस अधीक्षक पथकाला दुरून दारूचा अड्डा दिसतो सेलू पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी होती का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. हिंगणी परिसरात मोठ्या प्रमाणात मोहा सडवा साठवून हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती एसपी पथकाला मिळाली. त्यांनी थेट कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल नष्ट केला. विशेष म्हणजे एवढा मोठा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस सुरू असताना तो स्थानिक पोलिसांच्या नजरेस कसा आला नाही, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा रंगली आहे.

ग्रामीण भागातील शेतशिवारात उघडपणे सुरू असलेले हे अवैध उद्योग जर एसपी पथक शोधून काढतात येतात तर स्थानिक पोलिस यंत्रणा नेमकी काय करत होती असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कारवाई बाहेरच्या यंत्रणेला करावी लागते आणि स्थानिक पोलिस बघ्याची भूमिका का घेतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सेलू तालुयात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यांकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यत होत आहे.