*प्रशासन सज्ज
वर्धा,
'NEET' Exam नीट पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता हीच परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील ६ परीक्षा केंद्रांवरून १ हजार ८०० विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहे. त्याकरिता प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे; पण कुठल्या परीक्षा केंद्रावरून किती विद्यार्थी ही परीक्षा देणार याची माहिती लिक होऊ नये म्हणून परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, ही जबाबदारी असलेल्या वर्धेतील केंद्रीय विद्यालयातील अधिकारी सध्या मोठी गुप्तता बाळगत आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये पेपर पोहोचले आहे. ते कुठे ठेवण्यात आले याची इत्तंभूत माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. वर्धेतील प्रशासन निटसाठी अतियश संवेदनशील असल्याचे जाणवते आहे. प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.
वैद्यकीय अभ्यासक‘मासाठी नीट परीक्षा ही महत्त्वाची मानली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत ही परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना इंग‘जी, हिंदी, मराठीसह १३ भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. ही परीक्षा भौतिक, रसायन व जीवशास्त्र या विषयांच्या एनसीईआरटी अभ्यासक‘मावर आधारित असते. यापूर्वी झालेल्या परीक्षेतील अनागोंदी कारभार समोर आल्याने नीट पेपर फुटी प्रकरण देशात चांगलेच गाजले. नंतर ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता नीट परीक्षा रविवार २१ रोजी होणार आहे. जिल्ह्यात ही परीक्षा ६ परीक्षा केंद्रांवरून १ हजार ८०० विद्यार्थी देणार असल्याचे सांगण्यात आले.