नवी दिल्ली
rbi rules भारतीय रिझर्व्ह बँकेने चुकीच्या पद्धतीने योजना विकणाèयांना आणि मिस सेलिंग करणाèयांना आळा घालण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. यामुळे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण होणार आहे. विशेष म्हणजे व्यवहार करताना कोणत्याही चुकीच्या किंवा गरज नसलेल्या गोष्टींना ग्राहक बळी पडणार नाही. 1 जानेवारी 2027 पासून हे नियम लागू होणार आहेत.
rbi rules बरेचदा ग्राहक गृह कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँकेत जातात तेव्हा त्यांना संबंधित बँकेच्या भागीदारीतील कंपनीचा विमा खरेदी करा, अशी गळ घातली जाते. काही वेळा मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन फॉर्ममध्ये ग्राहकांच्या नकळत काही सेवा त्यांना दिल्या जातात किंवा अॅक्टिव्हेट केल्या जातात. अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्यावर आरबीआयने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात ग्राहकांच्या परवानगीशिवाय कोणतेही उत्पादन किंवा सेवा सुरू करता येणार नाही.
मिस सेलिंग होणार बंद
rbi rules ग्राहकांच्या गरजा आणि आर्थिक स्थितीची तपासणी न करता त्यांना उत्पादन विकणं, चुकीची किंवा अर्धवट माहिती देणं, त्यांच्या परवानगीशिवाय सेवा सुरू करणं किंवा कर्ज मंजुरीसाठी विमा खरेदीची अट घालणं यांचा यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारची चूक सिद्ध झाली तर संबंधित बँकेला ग्राहकाचे संपूर्ण पैसे परत करावे लागतील. शिवाय नुकसानभरपाई देखील द्यावी लागेल.