मुंबई,
Peddi's speed slowed down दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणयाचा बहुचर्चित ‘पेड्डी’ चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असला तरी दुसऱ्या आठवड्यात त्याच्या कमाईचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतरही सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याने निर्मात्यांचे लक्ष आता पुढील दिवसांच्या कमाईकडे लागले आहे.पहिल्या आठवड्यात चित्रपटाने जवळपास १९४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही वीकेंडला कमाईत वाढ दिसून आली. मात्र आठवड्याच्या सुरुवातीला प्रेक्षकसंख्या कमी झाल्याने कमाईचा आलेख खाली आला. तरीही चित्रपटाने आतापर्यंत २२० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत आपली उपस्थिती कायम ठेवली आहे.सुमारे ३५० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत आपल्या खर्चाचा मोठा हिस्सा वसूल केला असला तरी संपूर्ण गुंतवणूक परत मिळवण्यासाठी अजून मोठी मजल मारावी लागणार आहे. चित्रपटाला ब्रेक-ईव्हन गाठण्यासाठी आणखी सुमारे १३० कोटी रुपयांची कमाई आवश्यक असल्याचे चित्रपटसृष्टीतील जाणकारांचे मत आहे.