दिग्रस आगाराला राजमाता जिजाऊ बस

संजय राठोड यांच्या हस्ते 5 बसेसचे लोकार्पण

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
sanjay-rathod : एसटी आगाराला पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून शुक्रवार, 12 जूनला राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध झाल्या असून या नवीन 5 बसेसचे राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 
 
 
y13Jun-Jijau-Bus
 
 
 
महिला प्रवाशांची एसटीकडे ओढ वाढली असून ज्येष्ठ प्रवाशांना प्रवास आरामदायक व्हावा या दृष्टीकोनातून या विभागाचे आमदार तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस आगाराला राजमाता जिजाऊ 56 आसनी आरामदायक 5 बसेस उपलब्ध करून दिल्या.
 
 
 
या बसमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, प्रत्येक सीटजवळ यूसबी चार्जिंग सुविधा, आरामदायी प्रवासासाठी एअर सस्पेन्शन, लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक आराम आणि ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लाखो प्रवाशांना जोडणाèया लालपरीच्या प्रवासात आता आधुनिकतेची नवी जोड मिळाली आहे.
 
 
या नवीन बसेस लोकार्पण कार्यक्रम आगाराकडून घेण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अभय इंगळे, भाजपाचे अरुण राठोड, जागृती मेहता, सुरेंद्र मिश्रा, अमित चिद्दरवार, संजय घरत, संतोष मांजरखेडे व सदानंद जाधव उपस्थित होते.