मुंबई,
Ranveer buys a Ferrari worth crores बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याच्या चित्रपटांपेक्षा नव्या आलिशान कारने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडेच रणवीरने आपल्या कार संग्रहात एका अत्यंत महागड्या सुपरकारची भर घातली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरने अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सजलेली फेरारी २९६ जीटीबी खरेदी केली आहे. काळ्या रंगातील ही आकर्षक सुपरकार सुमारे ६ कोटी रुपयांहून अधिक किमतीची असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील रस्त्यांवर ही कार चालवताना रणवीर दिसल्याने चाहत्यांमध्ये आणि कारप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

रणवीर सिंगकडे आधीपासूनच अनेक आलिशान गाड्यांचा ताफा आहे. त्याच्या गॅरेजमध्ये ॲस्टन मार्टिन रॅपिड एस , लॅम्बोर्गिनी उरुसआणि मर्सिडीज-मेबॅकयांसारख्या महागड्या वाहनांचा समावेश आहे. नव्याने खरेदी केलेली फेरारी त्याच्या सर्वात प्रतिष्ठित आणि चर्चित गाड्यांपैकी एक मानली जात आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते. आता नव्या फेरारीमुळे रणवीर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत असून, त्याच्या लक्झरी जीवनशैलीची चर्चा रंगली आहे.