‘व्हॉइस ऑफ क्वीन’ पुरस्काराने रिमा तोडकर सन्मानित

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
यवतमाळ, 
Rima Todkar: ‘Voice of Queen’ Award येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान संचालित दिव्यांग सेवा प्रकल्पाची अंध विद्यार्थिनी रीमा तोडकर हिने गायन स्पर्धा ग्रँड फायनलमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त केला. तिला ‘व्हॉइस ऑफ क्वीन’ या पुरस्काराने रोख रक्कम 21 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. एका अंध मुलीने या स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त केल्याने यवतमाळकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
 
 
 
rima
 
एसके फिल्म प्रोडक्शन आणि ब्लॅक गोल्ड म्युझिकल इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे रविवार, 14 जून रोजी विदर्भस्तर कराओके गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रिमा तोडकर या अंध मुलीने सुरेल आवाजात गायन करून आयोजकांसह श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तिला प्रशिक्षक डॉ. माणिक मेहरे, दत्ता देशपांडे, अपर्णा शेलार यांनी गायनाचे धडे दिले. प्रकल्पासाठी अहोरात्र झटणारे सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, उपाध्यक्ष सुरेश राठी, उपाध्यक्ष डॉ. आलोक गुप्ता, सचिव अनंत कौलगीकर, कोषाध्यक्ष दीपक बागडी तसेच दिव्यांग सेवा समितीचे कार्याध्यक्ष प्रज्वल तुमसरे, सदस्य सोनम ठाकरे यांनी कौतुक केले. रिमा तोडकर हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.