रिसोड शहर पाणी टंचाईच्या उंबरवठ्यावर

अडोळ प्रकल्पात केवळ ७ टक्के पाणी शिल्लक

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
रिसोड,
water-crisis लांबलेला पाऊस व वाढते उष्णतामान यामुळे रिसोड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मालेगाव तालुयातील अडोळ लघु सिंचन प्रकल्पात केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने रिसोड शहर पाणी टंचाईच्या उंबरवट्यावर असून, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.
 
 
water-crisis
 
मृग नक्षत्र अर्धे झाले तरी पाऊस पडण्याचा अंदाज दिसेना उलट हवामान खात्या च्या निर्देशानुसार विदर्भात उष्णतेची लाट येणार असे सूचित करण्यात आल्याचा विपरीत परिणाम रिसोड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या आडोळ लघु सिंचन प्रकल्पावर झाला असून, प्रकल्पामध्ये केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा सात टक्के पाणी साठा काटकसरीने वापरल्यास पुढील एक महिना शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्पातील पाणीसाठा पाहता नागरीकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नप प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
रिसोड शहराला सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा दोन ते अडीच तास केला जातो .परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आठवड्याला होणार्‍या पाणीपुरवठ्यामध्ये एक ते दोन दिवस वाढू शकतात. त्याचबरोबर पाणीपुरवठा वेळेत अर्धा तास कपात होऊ शकते. ज्या नागरिकांचे पाणी भरणे झाले त्या नागरिकांनी आपल्या नळाची तोटी बंद करावी म्हणजे इतर घरातील नळाला चांगला पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी घरासमोर पाणी टाकणे, गाड्या धुणे बंद करावे असे आवाहन मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले आहे.