जंगलात कोसळले रशियाचे बॉम्बर विमान VIDEO

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
इर्कुत्स्क,
Russian bomber plane crashes रशियाच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला असून सायबेरियातील इर्कुत्स्क प्रदेशात एक सामरिक बॉम्बर विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. विशेष बाब म्हणजे विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक आणि इतर क्रू सदस्यांनी वेळेत बाहेर पडत आपला जीव वाचवला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित प्रशिक्षण उड्डाणावर असलेले Tu-22M3 हे लांब पल्ल्याचे बॉम्बर विमान अचानक तांत्रिक अडचणीत सापडले. परिस्थिती गंभीर होताच वैमानिकाने तातडीची कारवाई करत क्रू सदस्यांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही क्षणांतच विमान निर्जन जंगल परिसरात कोसळले.
 
 
plane crashes
 
दुर्घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये घनदाट जंगलाच्या दिशेने वेगाने खाली येणारे विमान आणि त्यानंतर उठणारे धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने बचाव आणि अग्निशमन पथके पाठविण्यात आली.स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, विमान कोसळलेला भाग वस्तीपासून दूर असल्यामुळे नागरिकांना कोणतीही हानी पोहोचलेली नाही. विमानातील सर्व सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून काहींना किरकोळ दुखापती झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रशियाच्या लष्करी ताफ्यातील Tu-22M3 हे महत्त्वाचे बॉम्बर विमान मानले जाते. दीर्घ पल्ल्याच्या मोहिमा पार पाडण्याची क्षमता असलेल्या या विमानाचा वापर विविध लष्करी कारवायांमध्ये करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.