नागपूर,
Traffic Rule Awareness नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभानिमित्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना, Smita's Creative Writing तर्फे विद्यार्थी आणि समाजहित लक्षात घेऊन एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. "स्वागत करू या विद्यार्थ्यांचे... पालन करू या वाहतूक नियमांचे" या संदेशावर आधारित आकर्षक आणि नाविन्यपूर्ण भेटवस्तू विद्यार्थ्यांना देण्याची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण असतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच त्यांच्यामध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. Traffic Rule Awarenessविद्यार्थ्यांना दिली जाणारी संदेशयुक्त भेट केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी उपयुक्त ठरणारी आहे. सुलभ शब्दरचना, आकर्षक रंगसंगती आणि प्रभावी संदेश यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.शाळांनी आणि विविध शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांचे स्वागत तर होईलच, शिवाय सुरक्षित वाहतुकीचा संदेशही समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. त्यामुळे या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ शाळा व संस्थांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य :स्मिता देशमुख,संपर्क मित्र