तभा वृत्तसेवा
झरीजामनी,
tripartite-security-committee-meeting : एम. पी. बिर्ला ग्रुपच्या आरसीसीपीएल प्रा. लि. द्वारे संचालित मुकुटबन लाइमस्टोन अँड डोलोमाइट माइन्स आणि परसोडा लाइमस्टोन माइन यांच्या पहिल्या त्रिपक्षीय सुरक्षा समितीची बैठक बुधवार, 10 जून रोजी नागपूर येथे पार पडली. खाण क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून खाण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक रामावतार मीना उपस्थित होते. तसेच, विशेष पाहुणे म्हणून उत्पादन आणि आरसीसीपीएलचे प्रकल्प प्रमुख रजतकुमार प्रस्ती हे देखील उपस्थित होते.
डीजीएमएस पश्चिम विभाग आणि नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकाèयांनी या बैठकीत भाग घेतला. त्यात खाण सुरक्षा संचालक साळवी, बाळकृष्ण पदार्थ, अर्का धुलिपाला सोमयाजुलू आणि उपसंचालक उमेशकुमार साहू व श्रीनिवास उपस्थित होते. तसेच आरसीसीपीएलचे युनिट प्रमुख सुनील सूद, कॉर्पोरेट मायनिंग हेड सूरज गुप्ता, खाणविभाग प्रमुख राठोर आणि त्याच्या टीमने सक्रिय सहभाग घेतला.
या व्यतिरिक्त, कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे परितोष गुंडावार, साई कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी आणि कर्मचारीही उपस्थित होते. व्यवस्थापन, सुरक्षा अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांच्या सक्रिय सहभागामुळे ही बैठक अत्यंत अर्थपूर्ण, उपयुक्त आणि प्रभावी ठरली.
सभेला संबोधित करताना रामावतार मीना यांनी खाण उद्योगातील सुरक्षा संस्कृती अधिक बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती (केंद्रीय) नियम 2026 च्या विविध तरतुदींचा हवाला देत ते म्हणाले, खाणीत काम करणाèया प्रत्येक कामगाराची सुरक्षा हे केवळ कायदेशीर बंधन नाही, तर एक नैतिक आणि मानवी जबाबदारी आहे.
त्यांनी विशेषतः सुरक्षित कार्यपद्धती, धोक्यांची लवकर ओळख, सतत प्रशिक्षण, सुरक्षा उपकरणांचा अनिवार्य वापर आणि कामगारांसाठी आरोग्य व कल्याण सुविधांची प्रभावी अंमलबजावणी यांच्या गरजेवर भर दिला. सुरक्षा केवळ कागदोपत्री औपचारिकता न राहता कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी आरसीसीपीएलचे रजतकुमार प्रस्ती यांनी प्रमुख पाहुण्यांची मते आणि सूचना गांभीर्याने विचारात घेतल्या आणि व्यवस्थापनाच्या वतीने आश्वासन दिले की, कर्मचारी आणि कामगारांची सुरक्षितता आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
बैठकीत उपस्थित असलेल्या इतर अधिकारी आणि प्रतिनिधींनीही आपली मते व्यक्त केली आणि खाणक्षेत्रात शून्य-अपघात ध्येय, सुरक्षित कार्यसंस्कृती, संवाद-आधारित व्यवस्थापन, कामगारांचा सहभाग आणि कल्याणकारी उपाययोजनांच्या गरजेवर भर दिला.