नेर,
two-wheeler-riders-killed : नेरपासून सात किमी अंतरावर दारव्हा मार्गावरील मुकुंदपूरजवळ झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात विनोद चिंतामण शेंडे (43) व निकेश कमलदास शेंडे (25) हे वाई पारस येथील रहिवासी ठार झाले. ते दुचाकीवरून गावाकडे जात असताना कार क्रमांक एमएच29 सीएच6714 या वाहनाने त्यांना धडक दिली. दर्शन बंडू सोनटक्के (35) हे या अपघातात जखमी झाले असून यवतमाळ येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात सहनिरीक्षक दामोदर वाघमारे या घटनेचा तपास करीत आहेत.