नागपूर,
Value Education Camp राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व लोककल्याण समितीच्या वतीने अजनी भागातील संस्कारवर्ग शिबिरांच्या एकत्रिकरणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १४ जून) साऊथ पॉईंट स्कूल येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजनी भाग संघचालक डॉ. रमाकांत कापरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून लोककल्याण समिती विदर्भ प्रांत महिला संयोजिका तथा नागपूर महानगर महिला संयोजिका प्रणिता जांभोरकर उपस्थित होत्या.
मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कागदी फुलांच्या पुष्पगुच्छांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. हे स्वागत महानगर टोली सदस्य सुजाता सरागे व भाग संयोजिका रतिका काशीमकर यांच्या हस्ते करण्यात आले. Value Education Campप्रमुख पाहुण्या प्रणिता जांभोरकर यांनी मुलांना ‘श्यामची आई’ आणि श्याम यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा सांगून संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजनी भाग सेवा चमू तसेच संस्कारवर्ग शिक्षिकांचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य:रतिका काशीमकर,संपर्क मित्र