तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
vikas-meena-mns : वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयामार्फत टंचाई अंतर्गत गावनिहाय रिचार्ज शाफ्टची निविदा रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. तरीदेखील यवतमाळ तालुक्यात कामे करण्यात येतच आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी सोमवार, 15 जून रोजी निवेदन देऊन ही निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे यावर आता जिल्हाधिकारी विकास मीना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टंचाई अंतर्गत काढलेल्या गावनिहाय निविदा ऑनलाईन काढण्यात आली नाही. त्यामुळे या कामाची निविदा ऑनलाईन निविदा काढण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी चिचबर्डी येथील सरपंच जयश्री राठोड व इतर नागरिकांनी केली होती. तरीदेखील यवतमाळ तालुक्यात ही कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही कामे तत्काळ बंद करून या कामाची शासनाच्या नियमानुसार निविदा काढून कामे पुन्हा करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.