वरोडा,
storm damage वरोडा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील एकोणा गावातील नागरिकांचे घरावरील छत उडून मोठे नुकसान झाले. वादळामुळे गावातील विद्युत पुरवठा जवळपास पाच-सहा तास खंडित झाला होता.
एकोण गावात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आकाश भरून आले व सोसाट्याचा वारा सुरू झाला. अचानक आलेल्या या पावसाने एकोणा गावाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत गावातील कलावती बळीराम भडके व एकनाथ कचरू पोईंनकर यांच्या घरावरील छप्पर उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या वादळामुळे गावाला विद्युत पुरवठा करणार्या विजेच्या तारा ही तुटल्या. storm damage यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांनी काही काळ अंधारात रहावे लागले. विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांनी या तारा जोडून रात्री 10 च्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला. पटवार्याने पंचनामा करून अहवाल तहसील प्रशासनाकडे पाठविला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी एकोणा ग्रामस्थांनी केली आहे.