पुणे,
Dog Killing Case बोपोडी परिसरात एका पाळीव श्वानाच्या निर्घृण हत्येची घटना समोर आली असून परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या श्वानाच्या चाव्याच्या घटनेचा सूड उगवत एका तरुणाने रात्रीच्या वेळी पाळीव श्वानावर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बोपोडी येथील तेली चाळ परिसरात राहणारे जीवन भीमसेन सोनवणे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात ‘ऑगी’ नावाचा पाळीव श्वान अत्यंत जिव्हाळ्याने सांभाळला जात होता. कुटुंबातील सदस्यांसारखेच त्याचे घरात स्थान होते. मात्र काही दिवसांपूर्वी ‘ऑगी’कडून शेजारी राहणाऱ्या आलम शेख (वय २७) याला चावा बसला होता. या घटनेनंतर संबंधित तरुणाच्या मनात राग आणि सूडभावना निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी (ता. १५) रात्रीच्या Dog Killing Case अंधारात जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा आरोपी आलम शेख याने गुपचूप 'ऑगी'ला गाठले. त्याने काहीही विचार न करता एका मोठ्या दगडाने थेट श्वानाच्या डोक्यात अत्यंत वेगाने प्रहार केला. या भीषण हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 'ऑगी'चा जागीच तडफडून मृत्यू झाला.दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मालक जीवन सोनवणे उठले, तेव्हा त्यांना 'ऑगी' रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनवणे यांनी तात्काळ खडकी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी आलम शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.