मुंबई
Alia Bhatt बॉलिवूडमध्ये बहुप्रतिक्षित ठरलेल्या अल्फा या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर आणि चित्रपटसृष्टीत चर्चेला मोठे उधाण आले आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच महिला गुप्तहेर केंद्रस्थानी ठेवण्यात आली असून, अभिनेत्री आलिया भट्ट हिचा जबरदस्त अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा सातवा चित्रपट असून, या विश्वात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे.
ट्रेलरची सुरुवात बॉबी देओल यांच्या आवाजातून होते, ज्यात ते एका लहान मुलीची ओळख करून देताना दिसतात. या मुलीचे नाव ‘सीता’ असल्याचे सांगितले जाते आणि तिच्या जीवनाला एका कठोर मिशनसाठी घडविण्यात आल्याचा संकेत मिळतो. पुढे कथानक एका गूढ आणि संघर्षमय प्रवासाकडे वळते, जिथे एका मुलीला बालपणापासूनच एका गुप्त ‘अल्फा’ कार्यक्रमासाठी प्रशिक्षण दिले गेल्याचे उघड होते.ट्रेलरमध्ये दाखवलेल्या कथानकानुसार, एका अत्याचारी आणि कपटी शक्तीच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे. पौराणिक संदर्भांचा वापर करत, विशेषतः रामायणातील ‘सीता’ आणि ‘लंका’ यांच्या प्रतिमांचा आधुनिक संदर्भात पुनर्वापर करण्यात आला आहे. नायिकेच्या संघर्षाची झलक देताना ती शेवटी अन्यायाविरुद्ध निर्णायक लढा देण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसते.
या चित्रपटात अनिल Alia Bhatt कपूर यांची महत्त्वाची भूमिका असून, कथानकाला वेगळे वळण देणारे अनेक ट्विस्ट्स ट्रेलरमध्ये सूचित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ट्रेलरच्या अखेरीस हृतिक रोशन यांची झलक दिसते, मात्र त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप गूढ कायम ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.