तभा वृत्तसेवा
दारव्हा,
yavatmal-urbans-darwha-branch : यवतमाळ अर्बन बँकेच्या दारव्हा शाखेचा 30 वा वर्धापनदिन सोहळा बुधवार, 17 जूनला बँकेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, संचालक तथा दारव्हा विभाग अध्यक्ष संजय डेहणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे, विभाग सचिव रामेश्वर सामुद्रे, विभागीय अधिकारी संजय खंडेतोड, दारव्हा नगर संघचालक गजानन गाभे उपस्थित होते.
दारव्हा तालुका व शहरातील नवीन ठेवीदार, नवीन कर्जदार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वर्धापनदिनी बँकेचे दारव्हा शहरातील सुजाण नागरिक, ठेवीदार, कर्जदार, सभासद, हितचिंतक, मधुसंचयी ठेव प्रतिनिधी, कर्मचारी तथा मातृशक्ती उपस्थित होत्या.
प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक संदीप उरगुंडे यांनी केले. गोपीचंद चव्हाण यांनी वैयक्तिक गीत सादर केले. अध्यक्ष नितीन खर्चे यांनी विश्वासाचा वारसा बँकेने जोपासला आहे. तसेच यावेळी त्यांनी बँकेच्या सुविधांबाबत माहिती दिली. विविध योजना, आर्थिक हितासोबत सामाजिक हित जोपासत असल्याचे आणि बँकेशी जुळून राहण्याचे आवाहन केले.
संचालक संजय डेहणकर यांनी दारव्हा शाखा सर्वांनाच अविरत सेवा देत आहे, असे सांगितले. ग्राहक मंचाचे तालुका अध्यक्ष प्रा. राजेंद्र ठाकूर व उपाध्यक्ष श्याम पांडे यांनी दारव्हा शाखा देत असलेल्या सुविधेविषयी समाधान व्यक्त केले. संचालन चेतन राठोड यांनी, तर आभारप्रदर्शन संध्या बावनथडे यांनी केले.