वर्धा,
artificial bird सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर क्षेत्रातील १२ धरण व तलाव परिसरात विशेष मोहीम राबवून तब्बल २०० हून अधिक कृत्रिम पक्षी थांबे उभारण्यात आले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात बोरधरण, पंचधारा धरण, मदन प्रकल्प, धाम प्रकल्प, बुदलागड तलाव, पेंढरी तलाव, नवरगाव तलाव, येलाटी तलाव, उमरविहिरी तलाव, मेटहिरजी येथील तलावांचा समावेश आहे. या नैसर्गिक पानवठ्यांवर विविध प्रजातींचे स्थलांतरीत पक्षीही येतात. पट्टेदार वाघाच्या संवर्धनासाठी उपयुत असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचेही संवर्धन व्हावे, या हेतूनेartificial bird नैसर्गिक पानवठ्यांच्या परिसरात वादळामुळे पडून वाळलेली जंगलातीलच खोडं कृत्रिम पक्षी थांबे म्हणून धरण आणि तलाव परिसरात लावण्याच्या सूचना वरिष्ठांकडून बोर प्रशासनाला प्राप्त झाल्या. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कोअर क्षेत्रातील सुमारे १२ धरण व तलाव परिसरात विशेष मोहीम राबवून कृत्रिम पक्षी थांबे उभारण्यात आले आहे.'
बोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे ४५ प्रजातींच्या शिकारी पक्ष्यांचा अधिवास आहे. यात १० प्रजातींच्या गरुडांचा समावेश असल्याचीही नोंद घेण्यात आली आहे.
२६७ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव विभागाच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणात २५७ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली होती. ती आता २६७ पर्यंत पोहोचली असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. बोर व्याघ्र प्रकल्पात प्रामुख्याने राखी डोयाची मस्त्य गरुड, आखुड बोटाचा सर्पगरुड, तुरेवाला सर्पगरुड, काळा गरूड, छोट्या ठिपयाचा गरुड, मोठ्या ठिपयाचा गरुड, नेपाळी गरूड, बोनेलीचा गरुड, सरडामार गरुड, मोरघार म्हणजेच हूम बाज किंवा व्याघ्र गरुड या शिकारी पक्ष्यांचा अधिवास असल्याची नोंदही घेण्यात आली आहे.