रांचीमध्ये आरएसएस कार्यालयावर हल्ला VIDEO

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
रांची,
Attack on RSS office in Ranchi झारखंडची राजधानी रांची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटनाकॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी आरएसएस कार्यालयावर दोन पेट्रोल बॉम्ब फेकले, ज्यापैकी एकाचा स्फोट झाला आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
 
 

Attack on RSS office in Ranchi 
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती घटनास्थळावरून बाहेर पडताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी सापडलेल्या काचेच्या बाटल्यांचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.दरम्यान, हा हल्ला पूर्वनियोजित असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत ती गंभीर असल्याचे म्हटले आहे. झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
 
 
 
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्ल्यात वापरलेल्या बाटल्या काचेच्या होत्या आणि त्यांचा वापर पेट्रोल बॉम्ब तयार करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. काही अहवालांनुसार, या प्रकरणाचा संबंध परिसरातील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी असलेल्या वादाशी जोडला जात आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.रांचीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या हल्ल्यामागील नेमका हेतू स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.