खरांगणा
water storage Wardha अद्याप मान्सूनचा पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळी कमी होत आहे. अशा स्थितीत आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्पामध्ये सध्या ३६.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पावर वर्धा शहर, अनेक गावे अवलंबून आहेत. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने योग्य वापर करण्याची गरज आहे.
वर्धा शहरासह पिपरी, पवनार आणि विविध ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या प्रकल्पातून होतो. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा समाधानकारक असला तरी भविष्यातील गरज लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धाम प्रकल्प हा परिसरातील प्रमुख जलस्रोत असून हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज या प्रकल्पातून भागवली जाते. सध्याच्या काळात तसेच पावसाळा पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य water storage Wardha नियोजन करणे आवश्यक आहे.
सध्या धरणात ३६.६० टक्के पाणीसाठा आहे. मात्र, पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.