दिग्रस,
farmers-news : हवामान अंदाज आणि निसर्गातील बदलांचे निरीक्षण करून जुने जाणते शेतकरी ही मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी, कडक उन्हाळ्यात शेतजमीन नांगरून तयार ठेवतात. पाऊस येण्याचा अंदाज घेऊन कोरड्या मातीतच बियाणे पेरले जाते, याला ‘धूळपेरणी’ म्हणतात. येथील प्रयोगशील शेतकरी डॉ. गजानन निचत यांनी ही पèहाटीची पेरणी 20 मे रोजी केली होती. बुधवार, 17 जूनला शेतात त्यांनी शेतीत पिकांमधील तण काढण्यासाठी आणि माती भुसभुशीत करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने ‘डवरा’ चालविला. हे छायाचित्र टिपले आहे ‘तभा’चे दिग्रस प्रतिनिधी अभय इंगळे यांनी.