मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता

शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान मिळणार

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
ex-gratia-grant : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालन झालेल्या बैठक सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी ५ लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकूण ८३२ कोटी रुपये दिले आहेत. अनावधानाने काढण्यात आलेल्या एका परिपत्राकामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित राहीले होते, आता त्यांनाही अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
 
j
 
 
 
२४ सप्टेंबर २०२४ रोजी अनुदाना संदर्भातले एक परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने निर्गमित केले होते. त्यातून मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकर्‍यांना वगळे होते. सदर शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेली चुक दुरूस्त करून अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
 
 
परंतु, एक वर्ष उलटून गेले असताना सुद्धा सदर विषयावर निर्णय झाला नव्हता. या संदर्भात आमदार प्रताप अडसड यांनी सुध्दा पाठपुरावा केला होता. अखेर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक बोलावून सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील आदेश तातडीने काढण्याचे निर्देश उपस्थित अधिकार्‍यांना दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अखेर मंत्री संजय राठोड यांनी केली. यासाठी त्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानन्यात आले. संघटनेच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यशस्वीता प्राप्त झाल्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे आभार मानून आनंद व्यक्त केला.
 
 
सदर बैठकीस आमदार प्रताप अडसड, आमदार शाम खोडे, आमदार सई डहाके, आमदार हरिष पिंपळे, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सहसचिव अजय भोयर, संघटन सचिव राजू लोणकर, विश्वनाथ शिंदे व इतर संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे मुंबईतले व सर्व जिल्ह्यातले अधिकारी उपस्थित होते.