वाळूची अवैध वाहतूक रोखली; ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर,
illegal sand समुद्रपूर पोलिसांनी वाळूच्या अवैध वाहतुकीविरुद्ध दोन स्वतंत्र कारवाया करत तब्बल ३८ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 

illegal sand transport seized Samudrapur, sand smuggling Maharashtra action, police raid sand mining Wardha district, unauthorized sand truck seized, 38 lakh property confiscated Maharashtra police, Wainganga river sand illegal transport, tractor sand seizure Samudrapur, sand mafia crackdown Maharashtra, mining violation police action India, MH32 truck sand case 
पहिली कारवाई आरंभा ते परडा शिवार परिसरात करण्यात आली. पोलिस प्रमोद थूल हे रात्री गस्तीवर असताना एम. एच. ३२ ए. जे. ७१३७ क्रमांकाचा १६ चाकी ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये अंदाजे १० ब्रास पांढरी वाळू आढळली. चालक जुनेद मोहम्मद खान रा. पेठ अहमदपूर, ता. आष्टी याच्याकडे वाळू वाहतुकीचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत ३० लाख रुपयांचा ट्रक व १ लाख रुपयांची वाळू असा ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई खंडाळा-नारायणपूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅटरची तपासणी केली असता वाकसूर येथील वणा नदीतून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी अजय कुमरे रा. हरनखुरी, अनिल आत्राम रा. लाहोरी तसेच ट्रॅटर मालक समीर मुडे रा. लाहोरी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅटर, ट्रॉली व एक ब्रास वाळू असा ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही प्रकरणात समुद्रपूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी केल्या.