कळमेश्वर,
Fire कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला. आज १७ जूनला पहाटे ५ वाजता दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागून कार्यालयातील कागदपत्रे जळाल्याची घटना घडली. कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद कार्यालयात रात्रपाळीतील कर्मचारी गुंडेराव कुमरे आग लागल्याचे दिसताक्षणी त्यांनी अग्निशामन दलाला याबाबत माहिती दिली. कळमेश्वर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही.

आगीबाबत नगरपरिषद, वाडी नगर परिषद सावनेर नगर परिषद मोहपा येथील अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. तीनही नगरपरिषदेचे अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करून. सकाळी ८ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले. परंतु या आगीत. नगराध्यक्षाची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली तसेच नगराध्यक्षाच्या केबिनला लागून असलेले आस्थापना विभाग, आरोग्य विभाग, आवक - जावक विभागातील कागदपत्रे व फर्निचर जळून खाक झाले. परंतु बांधकाम विभाग मालमत्ता कर विभाग (घर टॅक्स ), अकाउंट विभाग, जन्म-मृत्यू, पाणीपुरवठा विभागाला आगीची झळ पोहचली नाही. या विभागातील कागदपत्रे आगीपासून सुरक्षित आहे. या आगीमध्ये. नगरपरिषद कार्यालयातील फर्निचर लोखंडी कपाट पंखे. कम्प्युटर. जळून खाक झाल्यामुळे नागपूर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे आपल्या पोलिस कर्मचार्यासह घटनास्थळी दाखल होऊन आगीचा आढावा घेत त्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
आगीच्या घटनेची Fire माहिती मिळताच सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आ. आशिष देशमुख, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ. राजीव पोतदार, मुख्याधिकारी आकाश सुरडकर, नगराध्यक्ष अविनाश माकोडे, उपाध्यक्ष धनराज देवके, वीज वितरण कंपनीचे अभियंता विशाल ढोले यांच्यासह नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयाकडे धाव घेऊन आगीच्या घटनेची पाहणी करीत आढावा घेत उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी आकाश सुरडकर संपूर्ण आगेच्या घटनेची पाहणी करून आढावा घेतला व नगरपरिषदेतील बांधकाम विभाग, घर टॅक्स विभाग, अकाउंट विभाग पाणीपुरवठा विभाग व अन्य काही विभागातील कागदपत्रे यांची पाहणी करून सुरक्षित असल्याची खात्री केली व नागरिकांनी कुठलीही चिंता करू नये नागरिकांच्या सोयीसाठी कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालय परिसरातील नगरभवन येथे १८ जूनपासून नियमितपणे कामकाज सुरू करण्यात येईल असे सांगितले.
ब्राह्मणी येथील नगर परिषदेच्याFire प्रशासकीय इमारतीमध्ये लागलेली आग ही अतिशय दुर्दैवी घटना असून यामुळे नगरपालिकेचे आणि शासनाचे मोठे नुकसान झालेले आहे.प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे, असा अंदाज असून या आग लागल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न झाले की नाही. फायर ब्रिगेडला तातडीने बोलवण्यात आले की नाही, फायर ब्रिगेडची यंत्रणा ही चांगल्या पद्धतीने कार्यरत होती की नव्हती ,आग विझवायला विलंब झाला का आणि या आगीसाठी प्रशासनातील कोणी जबाबदार आहे का, या सर्व मुद्द्यातील उच्चस्तरीय चौकशीची मागणी तसेच नगरपरिषद कार्यालयाचेेे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे केलेली आहे . तसेच नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही सांगितले
-डॉ राजीव पोतदार