‘लगान’नंतर करिअरची दिशा हरवली? अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
मुंबई
Lagaan Movie बॉलीवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आमिर खान यांच्या बहुचर्चित ‘लगान’ या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर त्यात काम करणाऱ्या अनेक कलाकारांना वेगळी ओळखही मिळवून दिली.
 

Lagaan Movie Cast, Aamir Khan Lagaan Film, Ameen Hajee Interview, 
मात्र, याच चित्रपटात ‘बाघ’ ही भूमिका साकारणारे अभिनेता अमीन हाजी यांनी अलीकडेच केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ‘लगान’ चर्चेत आला आहे. हाजी यांनी सांगितले की, ‘लगान’नंतर त्यांच्या कारकिर्दीला अपेक्षित दिशा मिळाली नाही, उलट ती अडचणीत आली. त्यांच्या मते, या चित्रपटाने त्यांना एका विशिष्ट उंचीवर नेले, मात्र त्यानंतर मिळालेल्या भूमिका तुलनेने कमकुवत वाटू लागल्या, त्यामुळे त्या स्वीकारणे कठीण झाले.हाजी यांनी स्पष्ट केले की, ‘लगान’मध्ये प्रत्येक कलाकाराला समान महत्त्व असल्याने सर्वांना नायकासारखी प्रतिमा मिळाली होती. परंतु त्यानंतरच्या काळात आलेल्या भूमिका त्या तुलनेत प्रभावी नसल्याने त्यांनी अनेक संधी नाकारल्या आणि त्यातूनच त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला, अशी त्यांची भावना आहे.
 
 
वैयक्तिक आयुष्यातही महत्त्वाचा
‘लगान’ हा चित्रपट केवळ व्यावसायिक यशापुरता मर्यादित न राहता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही महत्त्वाचा ठरला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची ब्रिटिश सोशल अँथ्रोपोलॉजिस्ट शार्लोट व्हिटबी-कोल्स यांच्याशी ओळख झाली आणि पुढे या ओळखीचे रूपांतर विवाहात झाले. आज ते आपल्या कुटुंबासह स्थिर जीवन जगत असून, ‘लगान’च्या २५ वर्षांच्या निमित्ताने त्यांनी पत्नी आणि दोन मुलींसह सेलिब्रेशनही केले. या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.
चित्रपटानंतर Lagaan Movie अमीन हाजी यांनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांसाठी पटकथा सहाय्यक म्हणून योगदान दिले आहे. तसेच ‘कोई जाने ना’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
‘लगान’ने एकीकडे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख दिली असली, तरी या चित्रपटाशी जोडलेल्या कलाकारांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाच्या वेगवेगळ्या कहाण्या आजही समोर येत आहेत. अमीन हाजी यांचा ताजा खुलासा त्यापैकीच एक असून, तो पुन्हा एकदा या कल्ट चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला आहे.