साकोली
leopard rescue Sakoli वडद गावाजवळ नहाराच्या पाईप मध्ये लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. साकोली वनपरिक्षेत्रांतर्गत आज 17 रोजी ही कारवाई करण्यात आली.
साकोली वनपरिक्षेत्रांतर्गत सावरबांध नियत क्षेत्रातील वडद गावाशेजारी असलेल्या भोजराम बनकर यांच्या शेता जवळील नहराच्या पाईपलाईन मध्ये आज सकाळी बिबट लपून बसला असल्याचे लक्षात आले. याची माहिती गावच्या सरपंचा माधवी बडवाईक यांनी बीटरक्षक अंबुल यांना दिली. त्यांनी वरिष्ठांशी या संदर्भात संपर्क केल्यानंतर प्राणी बचाव दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ज्या पाईप मध्ये बिबट लपून बसला होता, leopard rescue Sakoli त्याचे तोंड एका बाजूने बंद करून दुसरीकडे पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्यात बिबट्याला पकडून नंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीअंती तो सुदृढ असल्याचे लक्षात येताच पुन्हा त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी सचिन कटरे, के. एस. शिवणकर यांच्यासह वनविभागाची अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मानव वन्यजीव संघर्ष उद्भवू नये म्हणून नागरिकांनी वन्य प्राणी दिसताच त्याची माहिती वनविभागाला द्यावी असे आवाहन उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांनी केले आहे.