नंदनवन मैदानात चार महिने दिवे सुरू; वीज वाया

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नागपूर,
nandanvan ground electricity wasted नंदनवन शिवनगर येथील दुर्गा पार्क मैदानातील दिवे मागील चार महिन्यांपासून दिवसरात्र सतत सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वीज वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे अद्याप संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
 
 
nandanvan
 
स्थानिक नागरिकांनी ऑनलाइन तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी तक्रार परिसरातून व्यक्त केली जात आहे. एकीकडे “वीज वाचवा” असे आवाहन प्रशासनाकडून केले जाते, तर दुसरीकडे अशा प्रकारे वीजेचा अपव्यय सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. “दिव्याखाली अंधार” अशी परिस्थिती येथे निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र