LSGच्या गोलंदाजाचे भारतीय संघात पदार्पण!

उपकर्णधार अय्यरने केली त्याला कॅप प्रदान

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ind-vs-afg : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना १३ जून रोजी खेळला गेला, ज्यात टीम इंडियाने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसरा एकदिवसीय सामना आता लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक नवीन खेळाडू टीम इंडियाकडून पदार्पण करणार आहे. हा खेळाडू आहे लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव, जो आज टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे. भारतीय उपकर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीपूर्वी प्रिन्स यादवला त्याची एकदिवसीय पदार्पणाची कॅप प्रदान केली.
 

LSG 
 
 
 
आयपीएल २०२६ मध्ये शानदार गोलंदाजी
 
प्रिन्स यादवला अफगाणिस्तान मालिकेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये बोलावण्यात आले असून तो मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पदार्पण करण्यास सज्ज आहे. २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने नुकतेच आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपल्या दुसऱ्याच आयपीएल हंगामात १९ बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याने गेल्या वर्षी लखनौकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. प्रिन्स दिल्ली प्रीमियर लीग २०२४ दरम्यान प्रकाशझोतात आला. त्या हंगामात, त्याने ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली-६ संघाकडून खेळताना १० सामन्यांमध्ये १३ बळी घेतले होते. या प्रभावी कामगिरीमुळे त्याची दिल्लीच्या व्हाईट-बॉल संघात निवड झाली. आणि आता, जवळपास दोन वर्षांनंतर, तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात तीन बदल आहेत. प्रिन्स यादव पदार्पण करत आहे. नितीश मांडीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि कुलदीप यादवचाही संघात समावेश आहे. यशस्वी जयस्वाल आजचा सामना खेळत आहे.
 
अफगानिस्तान (प्लेइंग इलेवन): रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), दरविश रसूली, राशिद खान, नांगेयालिया खरोती, एएम गजनफर, मोहम्मद सलीम सफी, बिलाल सामी.
 
भारत (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव.